पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश

घटनास्थळाची छायाचित्रे

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षादलांकडून एका दहशतवाद्यांला ठार मारण्यात शनिवारी यश आले. सुरक्षादलाच्या जवानांकडून या भागात शोध मोहिम सुरू असताना करण्यात आलेल्या कारवाईत या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. पोलिसांच्या प्रवक्त्याने शनिवारी ही माहिती दिली.

अनंतनाग जिल्ह्यातील एका भागामध्ये दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षादलाच्या जवानांनी शनिवारी पहाटेपासून या भागात शोध मोहिम सुरू केली. पोलिसांचे विशेष पथक, राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान यांनी संयुक्तपणे ही शोध मोहिम सुरू केली. नौगाममध्ये जवान एका भागाकडे जात असताना समोरून दहशतवाद्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनीही लगेचच त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. 

बालाकोटसाठी वापरलेले आणखी बॉम्ब विकत घेण्यासाठी भारतीय हवाई दलाचा करार

या भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शोध मोहिम सुरू आहे. या भागात कोणी अफवा पसरवू नये, म्हणून येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:anantnag encounter one terrorist neutralised in the exchange of fire between terrorists and security forces