पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महात्मा गांधींच्या नावाचा उल्लेख केलाच नाही : अनंतकुमार हेगडे

अनंतकुमार हेडगे

भाजप नेते आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भातील कथित वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. स्वातंत्र्य चळवळीसंदर्भात बोलताना महात्मा गांधी किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा मी उल्लेखच केला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी एएनआयला दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य चळवळ म्हणजे एक नाटक होते, या वक्तव्याच्या मुद्यावरुन ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. 

'महात्मा गांधींबद्दल अवमानकारक बोलणारे रावणाची औलाद'

एएनआयच्या वृत्तानुसार अनंतकुमार हेगडे म्हणाले की, १ फेब्रुवारी २०२० रोजी कार्यक्रमात केलेल्या विधानाची मी जबाबदारी घेतो. पण या कार्यक्रमात मी केवळ स्वातंत्र्य चळवळीसंदर्भात मत व्यक्त केलं होते. यावेळी कोणत्याही  राजकीय पक्षाचा, महात्मा गांधींच्या नावाचा अथवा अन्य कोणताही उल्लेख मी केला नव्हता. सार्वजनिक सभेतील माझे भाषण तुम्ही पाहू शकता. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी मी कधीच काही बोललेलो नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

कोरोना झालेल्या वृद्ध जोडप्याच्या भावनिक व्हिडिओ व्हायरल

अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचे पडसाद मंगळवारी लोकसभेत उमटल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर भाजपचे पक्षश्रेष्ठींनी देखील अनंतकुमार हेगडे यांच्यावर नाराजी व्यक्त केली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लोकसभेत काँग्रेसने अनंतकुमार हेगडे यांच्यावर जोरदार हल्ला चढविल्याचे पाहायला मिळाले होते. महात्मा गांधींबद्दल अवमानकारक बोलणारे रावणाची औलाद आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी अनंतकुमार हेगडे यांच्यावर टीका केली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Anant Kumar Hegde says Just categorised freedom struggle did not mention Gandhi after spark over his statement against Mahatma Gandhi