पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंडीत नेहरूंशी संबंधित आनंद भवन वास्तू संकुलाला मालमत्ता कर थकबाकीची नोटीस

प्रयागराजमधील आनंद भवन वास्तू

प्रयागराजमधील ऐतिहासिक आनंद भवन, स्वराज भवन आणि जवाहर प्लॅनेटोरियम या तिन्ही वास्तूंच्या संकुलाला प्रयागराज महापालिकेकडून ४.३५ कोटींची मालमत्ता कर थकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. या वास्तूंचा व्यावसायिक वापर केला जातो. त्यामुळे त्याप्रमाणे त्यांच्याकडून करवसुली केली जाते. ती थकल्यामुळेच आता नोटीस बजावण्यात आली असल्याचे महापालिकेने सांगितले. आनंद भवन आणि स्वराज भवन हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान होते. आता या विषयावरून पुन्हा एकदा वाद-विवाद होण्याची शक्यता आहे.

संस्कृत शिकवायला मुस्लिम प्राध्यापक नको म्हणून विद्यार्थ्यांचे आंदोलन

स्वराज भवन आणि आनंद भवन या दोन्ही वास्तू आता संग्रहालय आहेत. तिथे नेहरू कुटुंबियांच्या ऐतिहासिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीतील विविध घडामोडीची माहितीही या संग्रहालयात आहे. जवाहरलाल नेहरू स्मृती निधी या सेवाभावी संस्थेकडून या वास्तूंची देखभाल केली जाते. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी या संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

प्रयागराज महापालिकेचे मुख्य करनिर्धारण अधिकारी पी के मिश्रा म्हणाले, दोन आठवड्यांपूर्वीच आम्ही ही नोटीस पाठविली आहे. जवाहरलाल नेहरू स्मृती निधी या संस्थेचे प्रशासकीय सचिव एन. बालकृष्णन यांनी आम्हाला एक पत्र पाठविले आहे. संबंधित पत्र आता क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल सादर करण्यास क्षेत्रिय अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. 

JIOच्या ग्राहकांना बसणार झटका, मोबाइल सेवा महागणार

आनंद भवन ही पुरातन वास्तू आहे. त्यामुळे या वास्तूंवर लावण्यात आलेल्या मालमत्ता कराचा फेरआढावा घेतला जावा, असे पत्र बालकृष्णन यांनी महापालिकेला पाठवले आहे, असे प्रयागराजच्या महापौर अभिलाषा गुप्ता यांनी सांगितले.