पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने ८ वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाने केला बलात्कार

नागपूर बलात्कार

एकीकडे देश कोरोना विषाणूशी लढत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नोएडा येथे एका आठ वर्षीय मुलीवर चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बलात्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बलात्कार करणारा संशयित हाही १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली.

Lockdown 2.0ः भारताला ८ लाख कोटींचा फटका बसण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडातील दनकौर परिसरात राहणाऱ्या एका आठ वर्षीय मुलीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने सोमवारी रात्री उशिरा बलात्कार केला. पोलिस उपायुक्त राजेशकुमार सिंह म्हणाले की, दनकौर ठाण्याच्या अंतर्गत राहणाऱ्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने च़ॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला घरापासून दूर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. 

सरकारने गरिबांना वाऱ्यावर सोडले, चिदंबरम यांची टीका

मुलीच्या कुटुंबीयांनी दनकौर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी यापरुन गुन्हा नोंद केला आहे आणि संशयित मुलाला ताब्यातही घेतले आहे. त्याला बाल संरक्षण गृहात पाठवण्यात आले आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात असल्याचे पोलिस उपायुक्त राजेशकुमार सिंह यांनी सांगितले. 

कोणालाही कामावरुन काढू नका, पंतप्रधानांचं पुन्हा आवाहन