पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामात चकमक, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

अवंतीपोरा येथे सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.(ANI)

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी सुरक्षादल आणि दहशतवाद्य़ांमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अवंतीपोरा परिसरात मारल्या गेलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

याबाबत एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरातील ब्रोबुंदूना परिसराला घेराव घातला. शोध मोहीम सुरु असतानाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला.

पाक पंतप्रधानांना वाटतं PM मोदींनी पुढाकार घ्यावा

त्यानंतर सुरक्षादलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत सुरक्षादलाचे कोणतेच नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. मृत दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रेच्या काही दिवस आधीच दोन दिवसांपूर्वी अनंतनाग जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता.

अमिताभ बच्चन यांनी बिहारच्या २१०० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले

दहशतवाद्यांनी बुधवारी वर्दळीच्या ठिकाणी सीआरपीएफच्या एका गस्ती पथकावर हल्ला केला होता. यात सीआरपीएफचे ५ जवान शहीद झाले होते.