पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमिताभ बच्चन राष्ट्रीय चित्रपट सोहळ्याला राहणार अनुपस्थित

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे आज २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यास अनुपस्थित राहणार आहे. प्रकृती ठीक नसल्यानं आपण या सोहळ्यास उपस्थित राहू शकत नाही अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटवर दिली आहे.

भावालाही मुख्य भूमिका मिळायला हवी, आयुष्मानची इच्छा 

अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. नवी दिल्लीत आज पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. मात्र या सोहळ्यास बच्चन अनुपस्थित असणार आहेत. ताप आल्यामुळे प्रकृती ठीक नाही, त्यामुळे प्रवास करण्यास मला मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे दुर्दैवानं प्रकृतीच्या कारणामुळे मी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू शकत नाही, असं बच्चन यांनी  ट्विट करत सांगितलं. 

ऑक्टोबरपासून बच्चन यांची प्रकृती ठीक नाही. ऑक्टोबर महिन्यात बच्चन हे काही दिवसांसाठी रुग्णालयात होते. सध्या बच्चन यांचे वेळापत्रक खूपच व्यग्र आहे. ते पुढील वर्षी 'झुंड', 'गुलाबो सिताबो' आणि 'चेहरे' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तब्येतीच्या कारणामुळे अनेकदा त्यांना चित्रीकरण करताना अवघड जाते. 

सिनेमात 'नो किसिंग सीन'साठी तमन्ना भाटियाने तयार केला हा नियम

नुकतेच ते 'चेहरे' चित्रपटाचं चित्रीकरण संपवून परतले होते. स्लोव्हाकियातील अत्यंत थंड उणे १२ अंश सेल्शिअस तापमानामध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं.