पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदींनंतर बच्चन यांना ट्विटवर केले जाते सर्वाधिक फॉलो

अमिताभ बच्चन

बॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे ट्विटवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे भारतीय कलाकार आहेत. बच्चन हे सोशल मीडियावर खूपच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमांतून ते जगभरातल्या चाहत्यांशी अधिक जोडले आहेत. भारतात ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींनंतर अमिताभ बच्चन आहेत.

बडे दिलवाला! RRR साठी मानधन घेण्यास अजयचा नकार

ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर ७७ वर्षीय बच्चन यांचे ४ कोटींहून अधिक फॉलेवर्स आहेत. बच्चन यांच्या पाठोपाठ बादशहा शाहरूख खान आहे. शाहरुखचे जवळपास ३.९८ कोटी फॉलोवर्स ट्विटरवर आहेत.  मात्र यापूर्वी काहीवेळा बच्चन यांनी ट्विटरवर फॉलोवर्सची संख्या घटत असल्याची तक्रार कंपनीकडे केली होती. त्यांनी कंपनीकडे ठराविक काळानंतर ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांचा आकडा घटत असल्याची तक्रार केली होती. 

अक्षयची ब्रँड व्हॅल्यू वधारली, दीपिका- आमिरलाही टाकलं मागे

बच्चन हे लवकरच 'चेहरे', 'गुलाबो सिताबो', 'झुंड' आणि 'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटात दिसणार आहेत.