पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वातंत्र्यदिनी अमित शहांचा काश्मीर दौरा ठरलाय, पण...

अमित शहा

स्वातंत्र्यदिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन १५ ऑगस्ट रोजीचा शहांचा दौरा निश्चित होईल, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. गृहमंत्र्यांचा दौरा नियोजित आहे. पण राज्यातील परिस्थिती पाहूनच यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

काश्मिरी जनतेला भेटू देणार का? राहुल गांधींचा राज्यपालांना खोचक सवाल 

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर राज्यातील दहशतवादाला आळा बसेल, असे अमित शहा यांनी म्हटले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर सध्याच्या घडीला राज्यात तणावपूर्ण वातावरण असल्याच्या बातम्या येत आहेत. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मात्र हिंसाचाराच्या घटनेसंदर्भातील वृत्त यापूर्वीच फेटाळून लावले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला श्रीनगरमध्ये जाण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर श्रीनगरच्या लाल चौकात शहांच्या उपस्थितीत तिरंगा फडकवण्यात येणार असल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.

जम्मू-काश्मीरःएका रात्रीत काही बदलणार नाही, सरकारवर भरवसा ठेवावा लागेल-सुप्रीम कोर्ट

श्रीनगरच्या लाल चौकात अमित शहांच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला तर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील जम्मू काश्मीरमध्ये एनडीए सरकारचे दुसरे मोठे पाउल असेल. श्रीनगरच्या भेटीनंतर शहा १६ आणि १७ ऑगस्ट रोजी लडाख दौरा नियोजित असल्याचे समजते.