पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेत अमित शहा यांच्याकडून पहिल्यांदाच मांडले जाणार महत्त्वाचे विधेयक

अमित शहा (REUTERS)

जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेपासून १० किलोमीटरपर्यंत राहणाऱ्या नागरिकांना शैक्षणिक संस्थांमध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षणाचे फायदे मिळण्याची तरतूद असलेले विधेयक सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून लोकसभेत मांडण्यात येईल. लोकसभेत निवडून आल्यावर आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यावर अमित शहा यांच्याकडून सादर करण्यात येणारे हे पहिलेच विधेयक असेल.

राहुल गांधींविरोधात मुंबईच्या वकिलाची पोलिसांत तक्रार

लोकसभेमध्ये सोमवारी आधार संदर्भातील विधेयकही सादर होणार आहे. बँकेते खाते उघडण्यासाठी आणि मोबाईल सीमकार्डसाठी स्वेच्छेने आधार कार्डचा वापर करण्यासंदर्भातील तरतूद या विधेयकात असणार आहे. या दोन्ही विधेयकांना गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.

जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक २०१९, अमित शहा लोकसभेत मांडतील. जम्मू-काश्मीर आरक्षण कायदा २००४ मध्ये सुधारणा करण्याची तरतूद या विधेयकात असणार आहे. जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमा आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेपासून १० किलोमीटरपर्यंत राहणाऱ्या नागरिकांना शैक्षणिक संस्थांमध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षणाचे फायदे मिळण्याची तरतूद या विधेयकात असेल. या तरतुदीचा फायदा अंदाजे ३० लाख नागरिकांना मिळणार आहे.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्यांचा ६ महिने आधीच राजीनामा

आर्थिकदृष्ट्या गरिबांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी आणि नोकरी मिळण्यासाठी १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारीमध्येच मंजूर केले होते. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मिळत असलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त हे आरक्षण मिळणार आहे. 

केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून आधार संदर्भातील विधेयक लोकसभेत मांडतील.