पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहा आजपासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, सुरक्षा, विकासाचा घेणार आढावा

अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून (बुधवार) दोन दिवसांच्या जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतील. या बैठकीला राज्यपाल सत्यपाल मलिक हेही उपस्थितीत असतील. आपल्या दौऱ्यात शहा हे राज्याच्या सुरक्षेचा आढावा घेतील. तसेच विकास कार्यांचीही समीक्षा करतील. गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते जम्मू-काश्मीरमध्ये येत आहेत. 

भारताचा पाकवर विजय हा आणखी एक सर्जिकल स्ट्राइकः अमित शहा

सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबरील बैठकीनंतर शहा हे भाजपचे कार्यकर्त आणि पंचायत सदस्यांनाही मार्गदर्शन करतील. ते राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन त्याच्यांशी राज्यातील सद्यस्थितीतील सुरक्षेशी संबंधित स्थितीवर चर्चा करतील. या चर्चेत राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांचे अधिकारीही सहभागी होतील.

 

डिसेंबरपर्यंत अमित शहाच भाजप अध्यक्षपदी राहण्याची शक्यता - सूत्र

या दौऱ्यादरम्यान शहा हे अमरनाथ मंदिराला भेट देऊन तिथे पुजा करतील. यावर्षी अमरनाथ यात्र जुलैपासून सुरु होऊन १५ ऑगस्टपर्यंत चालेल. गुरुवारी ते पक्षाचे नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पर्यटन क्षेत्राशी निगडीत लोक आणि पंचायत सदस्यांची भेट घेतील.

भाजपत शिवराजसिंह यांच्याकडे मोठी जबाबदारी