पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Article 370: राज्यसभेत विधेयक सादर करण्यापूर्वी मनात भीती होती - शहा

अमित शहा

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मनात अनेक शंका-कुशंका होत्या, असे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी सांगितले. चेन्नईमधील एका कार्यक्रमात बोलताना शहा म्हणाले की, कलम ३७० संदर्भातील विधेयक संसदेत सादर करतावेळी काही शंका मनामध्ये होत्या. राज्यसभेत विधेयक सादर केल्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण होईल, अशी भीती होती. राज्यसभेत बहुमत नसताना देखील आम्ही विधेयक सादर करण्याचा निर्णय घेतला होता, असेही ते म्हणाले. तसेच कलम ३७० रद्द केल्याने दहशतवादाला आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

 

Article 370: मोदी-शहा जोडी कृष्ण अन् अर्जुनासारखी- रजनीकांत

अमित शहा यांच्या हस्ते राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या आयुष्यावर आधाररित 'Listening, Learning and Leading' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी कलम ३७० संदर्भात निर्णय घेण्यापूर्वी मनात निर्माण झालेल्या भावना व्यक्त केले. 
शहा म्हणाले की, आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतरचे चित्र जनतेसमोर आहे. जम्मू काश्मीर संदर्भातील निर्णयामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल का? अशी शंका मनामध्ये निर्माण झाली होती. या शंकेसह मी राज्यसभेत विधेयक सादर केले. सभापतींच्या कुशलतेमुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले नाही, असा उल्लेखही त्यांनी केला.