पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला

अमित शहा

अमित शहा यांनी शनिवारी सकाळी नॉर्थ ब्लॉकमध्ये केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्याला शक्यतो गृहमंत्रीपद दिले जाते. अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रीपद आल्यामुळे सरकारमधील त्यांचे वजन वाढले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी भाजपच्या विस्तारासाठी आणि विविध निवडणुकांमध्ये पक्षाच्या विजयासाठी केलेल्या प्रयत्नांचे फळ म्हणूनच त्यांना हे महत्त्वाचे खाते दिले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते देशाचे गृहमंत्री, अमित शहांचा लक्षवेधक प्रवास

शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी नॉर्थ ब्लॉकमध्ये येऊन औपचारिकपणे पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्या खात्यातील राज्यमंत्री जी. किशन रेड्डी आणि नित्यानंद राय हे सुद्धा उपस्थित होते. या दोघांनी अमित शहा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्यापासून नॉर्थ ब्लॉकमधील गृह मंत्रालयाच्या कार्यालयातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. गृह मंत्रालयापुढे सध्या आव्हाने काय आहेत आणि कोणकोणत्या पातळीवर मंत्रालयाने यशस्वीपणे पावले उचलली आहेत, याचे एक सादरीकरणही सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी तयार करून ठेवले आहे. अमित शहा यांच्यापुढे हे सादरीकरण सादर करण्यात येणार आहे. 

खातेवाटप जाहीर: अमित शहा देशाचे गृहमंत्री, निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थखाते

आधीच्या सरकारमधील गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही शनिवारीच संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. साऊथ ब्लॉकमधील संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी तिन्ही सेनादलाचे प्रमुख उपस्थित होते.