पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अयोध्येत चार महिन्यात गगनचुंबी राम मंदिर उभारणार'

अमित शहा

पुढच्या चार महिन्यात अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर उभारणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. झारखंडमधील पाकुड येथे अमित शहा यांची निवडणूक प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी झारखंड निर्माण करण्यासाठी मदत केली असल्याचे सांगितले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडचा विकास केला आणि नक्षलवाद्यांना २० फूट खोल जमिनीत गाडले असल्याचे सांगितले.

इंडिया गेटसमोर प्रियांका गांधींचे ठिय्या आंदोलन

अमित यांनी राम मंदिराबाबत असे सांगितले की, 'काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाचा निर्णय दिला. गेल्या १०० वर्षांपासून भारतीय नागरिक एकच मागणी करत होती की अयोध्येत भव्य राम मंदिर बनवले गेले पाहिजे. राम मंदिराबाबत सांगताना अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली. प्रत्येकाची इच्छा होती की राम मंदिर बांधले गेले पाहिजे. मात्र काँग्रेस आणि त्यांचे वकिल कोर्टात हे प्रकरण चालवून नका असे सांगायचे. यावर तुमच्या पोटात का दुखत आहे, असा सवाल अमित शहा यांनी काँग्रेसला केला आहे. 

डोंबिवली: गर्दीमुळे लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

दरम्यान, राम मंदिरसह दुसऱ्या इतर मुद्द्यांवरुन देखील अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. 'काँग्रेस देशाचा विकास करु शकत नाही, न देशाला सुरक्षित ठेवू शकत नाही, न देशाच्या जनतेच्या भावनांनचा सन्मान करु शकत नाही.' पुढे त्यांनी असे सांगितले की, 'गेल्या ५ वर्षात झारखंडमध्ये पंतप्रधान मोदी आणि रघुवर दास यांनी अनेक विकास कामं केली आहेत. 

जामिया हिंसाचार: एकाही विद्यार्थ्याचा मृत्यू झाला नाही - कुलगुरु