दिल्ली विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. दिल्लीत आज आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल सरकार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी विरोधी पक्षांकडून नकारात्मक राजकारण आणि भावना भडकवण्याचा आरोप केला. दिल्लीच्या जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली योजनाबद्धरितीने काम होत असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीच्या राजकारणात काँग्रेसला घेरण्यासाठी त्यांनी शीख दंगलीचा मुद्दा उपस्थित केला.
#WATCH Home Minister Amit Shah: Congress party ke netritva me tukde-tukde gang jo Dilli ke ashanti ke liye zimmedar hai, isko dand dene ka samay aa gya hai. Dilli ki janata ne dand dena chahiye. pic.twitter.com/3qJKEHlE9h
— ANI (@ANI) December 26, 2019
काँग्रेसवर टीका करताना त्यांनी शीख दंगलीचा मुद्दा समोर आणला. शीख दंगलीच्या इतक्या वर्षांनंतरही काँग्रेसच्या सरकारमध्ये पीडितांना न्याय मिळाला नाही. मोदी सरकार सत्तेवर येताच एसआयटी स्थापन करण्यात आली. आज दंगल करणारे कारागृहात आहेत. काँग्रेसच्या काळात पाच वर्षांत एक सरकार योजना बनवत असत. दुसऱ्या वर्षांत दुसरे सरकार त्यासाठी निधी मंजूर करत असत. तिसऱ्या ५ वर्षांत त्याचे भूमिपूजन केले जात आणि पुढच्या ५ वर्षांत काँग्रेस सरकार ती योजनाच विसरुन जात. काम होतच नसत.
Home Minister Amit Shah: Citizenship Amendment Bill par sansad ke andar charcha hui, koi kuchh bolne ko tayar nahi tha, idhar udhar ki batein karte the. Bahar nikalte hi isme bhram failana shuru kiya aur Dilli ko ashant kiya. (1/2) pic.twitter.com/90lQBAWqn7
— ANI (@ANI) December 26, 2019
केजरीवाल यांचा त्यांनी समाचार घेतला. केजरीवाल सरकार विकास कामात अडथळा निर्माण करण्याचे काम करते असा आरोप केला. केजरीवाल फक्त जाहिराती देऊन लोकांना फसवत आहेत. जीवनात त्यांना फक्त विरोध करणे आणि धरणे आंदोलन करण्याशिवाय दुसरे कामच येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
Amit Shah in Delhi: Modi ji ne sabko majboor kiya kaarya sanskriti follow karne ke liye,magar Delhi CM Kejriwal aise hain ki jo nayi nayi chiize karte rehte hain. Unhone nayi shuruaat ki,bhai sochna bhi kyu, budget bhi kyu dena,kisi ke kare karaye par apne naam ka thappa lga dena pic.twitter.com/06KGYcfOQ3
— ANI (@ANI) December 26, 2019
सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत विरोधी पक्षांनी दिल्लीच्या जनतेची दिशाभूल केली आहे. दिल्लीची शांतता भंग केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँग दिल्लीच्या अशांततेला जबाबदार आहे. दिल्लीच्या जनेतेने त्यांना दंड दिला पाहिजे.