पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मिरच्या डोमिसाईल नियमात बदल, १५ वर्षे रहिवासाची अट

अमित शहा

जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर आठ महिन्यांनी केंद्र सरकारने या केंद्रशासित प्रदेशासाठी डोमिसाईल नियमांची फेररचना केली. या डोमिसाईल नियमांची पूर्तता करणारे लोकच या केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रशासनात कनिष्ठ पदावर कामावर नेमले जाऊ शकतात किंबहुना त्यासाठी पात्र ठरू शकतात, असे सरकारने स्पष्ट केले.

लॉकडाऊन : बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा इशारा

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १५ वर्षांपासून राहात असलेले नागरिकच डोमिसाईलसाठी पात्र ठरतील. विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्यानंतर इतर कोणत्याही राज्यातील नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये राहू शकतो किंवा नोकरीसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळेच सरकारने जम्मू-काश्मीरमधील लोकांचा विचार करून डोमिसाईल नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवा नियम हा जम्मू-काश्मीरमधील मूळ वेतन २५,५०० साठी मिळणाऱ्या सर्व पदांसाठी लागू असेल, असेही सांगण्यात आले आहे.

SBI, PNB चा ग्राहकांना मोठा दिलासा, तीन महिने हप्त्यांची वसुली नाही

कलम ३७० रद्द करण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये कायमस्वरुपी निवासी असलेले नागरिकच तेथील सरकारी नोकरीसाठी पात्र ठरत होते. ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील राजकीय नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी डोमिसाईलचा मुद्दाच उपस्थित केला होता. इतर राज्यांपेक्षा जम्मू-काश्मीरसाठीचे डोमिसाईल नियम अधिक सुटसुटीत आणि उपयुक्त असतील, असे आश्वासन त्यावेळी अमित शहा यांनी या शिष्टमंडळाला दिले होते.