पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मतांच्या राजकारणामुळे तिहेरी तलाक विरोधी विधेयक रखडले होते : अमित शहा

अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिल्ली येथे तिहेरी तलाक संदर्भात आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. मताच्या ध्रुवीकरणामुळेच अनेक वर्षांपासून तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर  झाले नव्हते, असे वक्तव्य केले. अमित शहा म्हणाले की, काही राजकीय पक्षांना मतांचे राजकारण करण्याची सवय झाली आहे. ध्रुवीकरणाच्या या राजकारणात तीन तलाक विधेयक दुर्लक्षित राहिले.

आम्ही सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचा विचार कल्पनेसह प्रत्येकाच्या भावना आणि संवेदनाचा विचार करुन तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मुस्लीम महिलांना त्यांचा अधिकार मिळाला. अमित शहा पुढे म्हणाले की, यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या व्यासपीठावर मी तिहेरी तलाक विषयी बोललो आहे. पण तिहेरी तलाक विरोधी विधेयक कायदेशीर झाल्यानंतर याविषयावर व्यक्त होत असल्यामुळे आज खूप अतिशय आनंदी आहे. मुस्लीम महिलांना वचिंत ठेवणाऱ्या प्रथेचं उच्चाटन करुन सरकारने त्यांना न्याय दिला.  

तिहेरी तलाक, कलम ३७० नंतर देशात एकत्रित निवडणूक घेण्याची तयारी

देशाचा विकास आणि समाजातील एकरुपता यात देखील मतांच्या राजकारणाचा प्रभाव दिसून येतो. समाजाच्या विकासाची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मनात जनतेविषयी संवेदना असेल तरच तुम्ही त्यांना न्याय देऊ शकता. मतांचे राजकारण करुन या अशा गोष्टी शक्य होत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर तोफ डागली.  

तिहेरी तलाक विरोधी कायदा लागू, राष्ट्रपतींची मंजुरी