पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर तणावः अमित शहांनी घेतली अजित डोवल यांची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी संसदेत गृह सचिव राजीव गोबा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची भेट घेतली. 

गेल्या तीन दिवसांपासून काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हालचाली आणि अमरनाथ यात्रा स्थगित करण्यामागचे उत्तर अखेर मिळाले आहे. भारतीय सैन्यदलाच्या सतर्कतेमुळे बॅटच्या हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या सर्व शंका-कुशंकांना पूर्णविराम मिळाला. 

भारतीय सैन्याने पाकला म्हटले, पांढरे निशाण घेऊन या, मृतदेह घेऊन जा

दरम्यान, अमित शहा सोमवारी राज्यसभेत जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०१९ सादर करणार आहेत. या विधेयकात जम्मू आणि काश्मीरमध्ये १० टक्के आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग (ईडब्ल्यूएस) कोटा देण्याची तरतूद आहे.

दुसरीकडे, सरकारच्या सूचनेनंतर यात्रेकरु आणि पर्यटक काश्मीर सोडत आहेत. त्यामुळे विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील एनआयटीतून सुमारे ८०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बसच्या माध्यमातून श्रीनगरवरुन जम्मूला पाठवण्यात येत आहेत.