पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

J&K मधील ११ दिवसांच्या मुक्कामानंतर डोवाल यांनी घेतली शहांची भेट

डोवाल यांनी घेतली शहांची भेट

जम्मू काश्मीरमध्ये ११ दिवसांच्या निगरानीनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. काश्मीर खोऱ्यातील सद्य परिस्थितीसंदर्भात बैठकीत खास चर्चा झाली. 

केंद्र सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अमित शहांसोबतच्या बैठकीत अजित डोवाल यांच्यासह गृह सचिव राजीव गौबा आणि  गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. काश्मीरमधील परिस्थितीवर बारिक लक्ष ठेवण्यासाठी खुद्द राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तब्बल ११ दिवस काश्मीर खाऱ्यात होते. शुक्रवारी ते दिल्लीला परत आले आहेत. त्यामुळे डोवाल यांनी काश्मीरमधील परिस्थितीची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली असावी, असे बोलले जात आहे.    

काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप

काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा आणि या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्तावाला मंजूर देण्यापूर्वीच केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा तुकड्या पाठवल्या होत्या. यासोबतच याप्रदेशातील शांती सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. टप्प्या टप्याने कर्फ्यू हटवण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे.  

आता काँग्रेस नेत्यानेही केलं कलम ३७० हटवण्याचे स्वागत

काश्मीरमध्ये सोमवारी निर्बंधामध्ये सूट मिळाल्यानंतर वेगवेगळ्या शाळेचे दरवाजे उघडले. मात्र शिक्षकांशिवाय विद्यार्थांची वर्दळ दिसली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील १९० प्राथमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात सरकारने नियोजन केले. पण काश्मीर खोऱ्यातील इतर भागात सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी सलग १५ व्या दिवशी देखील काश्मीर खोऱ्यातील अनेक शाळा बंद होत्या. पोलिस पब्लिक स्कूल आणि काही केंद्रीय विद्यालयाच्या काही शाळेत थोड्या प्रमाणात विद्यार्थी होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Amit Shah Meets National Security Advisor Ajit Doval Intelligence Bureau Chief On Jammu and Kashmir