पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहा गृहमंत्री आहेत, देव नाही, ओवेसींचा हल्लाबोल

अमित शहा, असदुद्दीन ओवेसी

राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकार वाढवणारे विधेयक सोमवारी मोठ्या चर्चेनंतर संमत झाले. सभागृहात एनआयए विधेयकावर चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यात प्रचंड वादावादी झाली. संसदेतून बाहेर जाताना ओवेसी यांनी शहा यांच्यावर निशाणा साधला. जो कोणी त्यांच्या (भाजप) निर्णयाचे समर्थन करत नाही, त्यांना ते देशद्रोही म्हणतात, असा आरोप, त्यांनी केला. 

ओवेसी यांनी 'एएनआय'शी बोलताना म्हटले की, त्यांनी राष्ट्रभक्ती आणि देशद्रोहींचे दुकान उघडले आहे का? अमित शहांनी माझ्याकडे बोट करुन धमकावले. पण ते फक्त एक गृहमंत्री आहेत, देव नाही. त्यांनी आधी नियम वाचले पाहिजेत. 

तत्पूर्वी, एनआयए विधेयकावर लोकसभेत मोठा गोंधळ झाला. भाजप नेते सत्यपाल सिंह यांनी संसदेत म्हटले की, हैदराबादमधील पोलिस प्रमुखाला एका नेत्याने एका आरोपीविरोधात कारवाई करण्यापासून रोखले होते. जर त्यांनी कारवाई केली तर त्यांना अडचणीचा सामना करावा लागेल, अशी धमकी दिली. त्यावेळी ओवेसी हे आपल्या जागेवरुन उठले आणि भाजप सदस्य ज्या वैयक्तिक चर्चेचा उल्लेख करत आहेत, ज्यांचे नाव घेत आहेत. ते सध्या सभागृहात उपस्थितीत नाहीत, असे म्हटले. 

NIA चे अधिकार वाढविणारे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर

सभागृहात उपस्थितीत असलेले गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरीत म्हटले की, जेव्हा द्रमुक सदस्य ए राजा बोलत होते. त्यावेळी ओवेसी यांनी का रोखले नाही? ते भाजपच्याच सदस्याला का रोखत आहेत? वेगवेगळे मापदंड नसायला हवेत.

यावर ओवेसी म्हणाले की, तुम्ही गृहमंत्री आहात. मला घाबरवू नका. मी घाबरणाऱ्या पैकी नाही. शहा यांनीही लगेच उत्तर दिले. मी कोणाला घाबरवत नाही. जर एखाद्याच्या मनात भिती बसली असेल तर काय केले जाऊ शकते, असा टोला त्यांनी लगावला.