पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरसाठी आमची प्राण देण्याची तयारी - अमित शहा

अमित शहा

जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत मांडले. विधेयक मांडण्यापूर्वी काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सभागृहात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी अधिररंजन चौधरी यांच्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेतला. 

अखंड हिंदुस्थानचे निम्मे स्वप्न पूर्ण झाले, शिवसेनेकडून सरकारचे कौतुक

अधिररंजन चौधरी म्हणाले, १९४८ पासून जम्मू-काश्मिरचा विषय संयुक्त राष्ट्रसंघात आहे. एकीकडे तुम्ही म्हणता हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. दुसरीकडे तुमचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की काश्मिरचा मुद्दा द्विपक्षीय आहे. त्यामध्ये इतर कोणीही हस्तक्षेप करू नये. नक्की हा प्रश्न काय आहे हे आम्हाला सांगा. काँग्रेस पक्षाला हे समजून घ्यायचे आहे.

कलम ३७० : अमित शहा यांना कोणाची मदत होती माहितीये?

अधिररंजन चौधरी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, जम्मू-काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. मी जेव्हा जम्मू-काश्मीर म्हणतो. त्यावेळी त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चिनचाही समावेश होतो. त्यामुळे काश्मीर संदर्भात कोणताही कायदा करण्याचा संसदेला पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी कोणाच्याही परवानगीची भारताला गरज नाही. गरज पडली तर जम्मू-काश्मीरसाठी आम्ही आपले प्राण देऊ, असेही अमित शहा यांनी सांगितले.