पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नितीश कुमारांवर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला शहांनी सुनावले

अमित शहा

इफ्तार पार्टीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करणे केंद्रीय मंत्र्यांना चांगलेच महागात पडले आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी इफ्तार पार्टीत सहभागी झालेल्या नितीश कुमार यांचे फोटो  ट्विटरवरुन शेअर करत त्यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गिरीराज सिंह यांना फोन करुन धमकी वजा इशारा देत अशा प्रकारापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

गिरीराज यांनी इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालेल्या नितीश कुमार, रामविलास पासवान या नेत्यांचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केले होते. हे चित्र नवरात्री उत्सव साजरा करताना दिसले असते तर किती प्रेमळ वाटले असते, असे कॅप्शनसह ट्विट करत त्यांनी एनडीएच्या नेत्यांवर टिप्पणी केली होती. प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी गिरीराज सिंह यांनी हे कृत्य केल्याची प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली होती.  

सोमवारी माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत नितीश कुमारांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहानंतर त्यांनी जितन राम मांझी यांची गळाभेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी जवळपास १३ मिनिटे एकमेकांसोबत चर्चा केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:amit shah has phone calle union minister giriraj singh to avoid making statements like nitish kumar iftar party