पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहा यांनी NSG सुरक्षा नाकारली, CRPFचे जवानच पुरविणार सुरक्षा

अमित शहा यांना सीआरपीएफकडून सुरक्षा पुरविली जाणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना देण्यात आलेली एनएसजी कमांडोची सुरक्षा नाकारली असून, यापुढेही त्यांना केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांकडूनच सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. या निर्णयाशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. 

ममता बॅनर्जी नरेंद्र मोदींची भेट घेणार, राजकीय वर्तुळात चर्चा

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रीपदी अमित शहा यांची नेमणूक झाल्यावर गृह मंत्रालयातील सुरक्षा पुरविण्यासंदर्भातील समितीची बैठक झाली. त्यामध्ये अमित शहा यांच्या जीविताला असलेला धोक्याचा विचार करण्यात आला. अमित शहा यांना जुलै २०१४ पासून केंद्रीय राखीव पोलिस दलांची (सीआरपीएफ) सुरक्षा पुरविण्यात आली आहे. पण गृहमंत्री पदावरील व्यक्तीला नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) यांच्याकडून सुरक्षा पुरविली जाते. याआधीचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एनएसजीकडून सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यामुळे अमित शहा यांनाही एनएसजी सुरक्षा पुरविली जावी, असे समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.

या संदर्भात कोणाकडून सुरक्षा पुरविली जावी, असे अमित शहा यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांकडूनच सुरक्षा पुरविण्याला पसंती दिली. त्यामुळे त्यांना सीआरपीएफकडूनच सुरक्षा पुरविण्यात येत आहे.

लालबागचा राजाच्या दागिन्यांचा लिलाव; मंडळाला मिळाले कोट्यवधी रुपये

केंद्रीय राखीव पोलिस दल हे निमलष्करी दल म्हणून ओळखले जाते. या दलातील जवानांकडून अमित शहा यांना झेड प्लस स्वरुपाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. तसेच या दलाकडून त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात आणि त्यांच्या दौऱ्यांवेळीही सुरक्षा पुरविली जाते.

केंद्रीय राखीव पोलिस दलाकडून सुरक्षा घेणारे अमित शहा हे पहिलेच केंद्रीय गृहमंत्री आहेत. या सुरक्षेअंतर्गत अमित शहा यांना केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १०० जवानांकडून सुरक्षा पुरविली जाते. हे जवान तीन शिफ्टमध्ये कार्यरत असतात. 

अमित शहा यांच्या घराभोवती दुसऱ्या स्तरावरील सुरक्षा दिल्ली पोलिसांकडूनही पुरविली जाते. त्यांचे कार्यक्रम, दौरे या संदर्भातही दिल्ली पोलिसांकडून नियोजन केले जात असते.