पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डिसेंबरपर्यंत अमित शहाच भाजप अध्यक्षपदी राहण्याची शक्यता - सूत्र

अमित शहा

येत्या चार महिन्यांत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे तूर्त तरी भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा अमित शहा यांच्याकडेच कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. डिसेंबरपर्यंत तेच याच पदावर कायम राहतील, असे सांगण्यात आले आहे. भाजपमध्ये 'एक व्यक्ती एक पद' धोरण आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे असे गृह खाते देण्यात आले आहे. त्यामुळे ते आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पायउतार होतील, असे संकेत मिळाले होते. 

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीही म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

अमित शहा यांनी गुरुवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक नवी दिल्लीत बोलावली होती. या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका, नवीन सदस्य नोंदणी मोहिम आणि इतर विषयांवर चर्चा झाली. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय, भूपेंद्र यादव आणि जे पी नड्डा या बैठकीला उपस्थित होते. सर्व प्रदेशाध्यक्षही बैठकीसाठी उपस्थित होते.

वेळेत ऑफिसला पोहोचा, घरून काम करू नका; मोदींची मंत्र्यांना सूचना

पक्षातील रिक्त जागा नव्याने भरण्यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यावर बैठकीत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात अमित शहा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. त्यावेळी या पदासाठी जे पी नड्डा आणि भूपेंद्र यादव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. पण आता डिसेंबरपर्यंत अमित शहाच या पदावर कायम राहतील, असे समजते. 

येत्या काही महिन्यांत इतर विधानसभा निवडणुकीसोबतच जम्मू-काश्मीरमध्येही विधानसभेची निवडणूक घेण्यात येईल, अशी चर्चा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे.

अमित शहा यांनी शुक्रवार पक्षाच्या विविध राज्यातील सरचिटणीसांची बैठकही बोलावली आहे.