पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा: डॉक्टरांना मिळणार सुरक्षा, गृहमंत्र्यांचे आश्वासन

अमित शहा

देशावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांची टीम रात्रं-दिवस मेहनत करत आहे. अशामध्ये नागरिकांनी कोरोना तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांच्या टीमवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या घटनांना लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टरांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. 

वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देणार - गृहमंत्री अनिल देशमुख

डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) २३ एप्रिल रोजी काळा दिवस मानण्याची घोषणा केली आहे. आयएमएच्या विरोधाला लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी आयएमएच्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी अमित शहा यांनी डॉक्टरांना विरोध प्रदर्शन करु नका असे आवाहन केले आहे. 

पालघर प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही: गृहमंत्री

गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर आणि आयएमएच्या प्रतिनिधींच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, डॉक्टरांवरील हल्ल्या प्रकरणी आयएमएने केंद्र सरकारकडे डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. असोसिएशनने देशभरातील डॉक्टरांना सफेद कोट घालून मेणबत्त्या जाळण्याचे आवाहन केले आहे. 

लॉकडाऊनमुळे कोरोनाची पहिली लाट काही प्रमाणात रोखली, पण...

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:amit shah assured doctors security and appealed to them to not to do even symbolic protest as proposed by them