पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांगला खासदार कसा असावा?, अमित शहांनी दिला 'मंत्र'

अमित शहा

भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन केले. आपण जे बोलतो त्यामुळे खासदार आणि आपल्या लोकशाहीची पत तयार होते आणि बिघडतेही, हे प्रथम लक्षात घ्या, असा सल्ला देत आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे उत्तर देणे वाईट नाही. पण त्याचबरोबर कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत आपले योग्य आणि महत्वपूर्ण योगदान असले पाहिजे, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, आज मला 'चांगला खासदार कसा व्हावा' यावर बोलण्यासाठी बोलावले आहे. पण सत्य हे आहे की मी २० वर्षे आमदार होतो. दोन वर्षांपासून राज्यसभा खासदार आहे. पण लोकसभेत निवडून येण्याची संधीही मला पहिल्यांदाच मिळाली आहे. अनेक लोकांना वाटत असेल की अमित शहा हेही आजच आले आहेत आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. 

मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्याची गुजरात ते दिल्ली सायकलवारी

सर्व पक्षांचे खासदार येथे उपस्थितीत आहे. तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात, यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. आपल्याला ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की १३० कोटी लोक देशातील ५४३ खासदार निवडून देतात. आपण त्या ५४३ पैकी एक आहोत. सरासरी आपल्यापैकी प्रत्येकजण १५ लाखांहून अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

संसद ही फक्त राजकीय गोष्टी करण्याचे, उत्तरे देण्याचे किंवा आरोप करण्याचे ठिकाण नाही. वेगवेगळ्या पक्षांच्या विचारधारांना जनतेमध्ये ठेवण्याचे हे फक्त माध्यमच नाही. आपण बहुपक्षीय संसदीय व्यवस्थेच्या आत आहोत. या व्यवस्थेत आपण पक्षाच्या विचारधारेनेच जनतेमध्ये जातो. आपण तेथूनच निवडून येत असू तर आपल्याला आपली विचारधारा तीच ठेवली पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कायदा बनवणारी ही सर्वोच्च संस्था आहे. देशातील प्रत्येक नागरिकासाठी येथे कायदे तयार केले जातात. सदनाच्या पटलावर आपल्या पक्षाची विचारधारा ठेवली पाहिजे. पण यात कायदा बनवण्यातही आपल्या योगदानाचे महत्व समजले पाहिजे.

पंतप्रधान मोदींकडून भाजप खासदारांची कानउघडणी