पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉक्टरांचे प्रेस्क्रिप्शन असलेल्यांना मद्य द्या, ... या मुख्यमंत्र्यांचे आदेश

गोव्यातील मद्य व्यवसायिक चिंतेत

एकीकडे कोरोना विषाणूशी लढणाऱ्या केरळमधील मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या सरकारला आता सामाजिक आघाडीवरील एका नव्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते आहे. त्यासाठीच त्यांच्या सरकारने ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्री सुरू करता येईल का, यावर विचार सुरू केला आहे. केरळमध्ये मद्य न मिळाल्यामुळे ८ जणांनी आत्महत्या केली आहे तर एकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. 

वायफळ खर्च टाळा, काटकसर करा, शरद पवार यांचा सल्ला

खुद्द मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषेदत या नव्या संभाव्य प्रश्नाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, अचानकपणे एके दिवशी मद्य मिळणे बंद झाल्यामुळे एक नवा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे काहीजणांना मद्याची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे. त्यांनी राज्यातील उत्पादन शुल्क विभागाला काही निर्देशही दिले आहेत. ज्यांच्याकडे डॉक्टरांचे प्रेस्क्रिप्शन आहे, अशा नागरिकांना मद्य द्यावे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

अचानक मद्य न मिळाल्यामुळे ज्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यांच्यावर मोफत उपचार केले जावेत. गरज पडल्यास त्यांना व्यसनमुक्ती केंद्रातही दाखल केले जावे, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लॉकडाऊननंतर अचानक मद्य मिळणे बंद झाल्यामुळे केरळमध्ये अनेकांना त्रास होऊ लागला आहे. काही ठिकाणी आत्महत्येची प्रकरणेही समोर आली आहेत. त्यामुळेच पिनरई विजयन यांनी ही पावले उचलली आहेत.

लॉकडाऊननंतर नरेंद्र मोदी यांचे दैनंदिन काम नेहमीप्रमाणेच, फक्त...

गेल्या शनिवारी थ्रीसूर जिल्ह्यात एकाने मद्य न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. तर कायमकुलममध्ये एका ३८ वर्षीय व्यक्तीने मद्य न मिळाल्यामुळे दाढी करण्यासाठी वापरले जाणारे शेव्हिंग लोशन प्राशन केले.