पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनः कर्फ्यू पास मागणाऱ्या पोलिसाचा हातच छाटला

शीखांनी एका पोलिस अधिकाऱ्याचा हातच पूर्णपणे कापून टाकला आहे.

एकीकडे देश कोरोना विषाणूशी युद्ध करत आहे. तर पंजाबमधील पटियाला येथे निहंग शीखांनी (पारंपारिक हत्यार बाळगणारे निळ्या रंगाचा शर्ट परिधान करणारे शीख) पोलिसांवर हल्ला केला. या शीखांनी एका पोलिस अधिकाऱ्याचा हातच पूर्णपणे कापून टाकला आहे. ही घटना रविवारी सकाळी भाजी मार्केटच्या बाहेरील मुख्य प्रवेशद्वारावर घडली. या हल्ल्यात इतर पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. 

लॉकडाऊनः मोदी सरकार देशाची तीन झोनमध्ये विभागणी करण्याची शक्यता

पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांनी सांगितले की, या हल्ल्यात एएसआय हरजित सिंग यांचा हात कापला गेला आहे. त्यांना चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात इतर अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून यात बाजार मंडळाच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या हल्ल्याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. 

पटियालाचे पोलिस अधीक्षक मनदिपसिंग सिद्धू यांनी सांगितले की, एका गाडीत आलेल्या लोकांना संचारबंदीतील पास दाखवण्यास सांगितले. परंतु, त्यांनी आपल्या गाडीने बॅरिकेट उडवले. त्यानंतर त्यांनी त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. 

धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा ४३ वर, १५ नव्या रुग्णात वाढ

या तलवार हल्ल्यात एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा हात छाटला गेला. पटियाला सदर ठाण्याचे प्रभारीही जखमी झाले. जखमी अधिकाऱ्याला त्वरीत राजेंद्र रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडला पाठवण्यात आले. हल्ल्यानंतर निहंग शीख घटनास्थळावरुन पळून गेले. नंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून ७ जणांना  अटक केली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Amid coronavirus lockdown Punjab Nihangs chop off policeman hand after being asked for curfew passes