पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-19 : मास्कसाठी चक्क रुग्णवाहिका पळवली!

कोरोनाच्या दहशतीमुळे मास्कची मागणी वाढली आहे. (संग्रहित छायाचित्र)

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान याकाळात मास्क तसेच सॅनेटिझरचा काळाबाजार सुरु असल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता मास्कसाठी चक्क रुग्णवाहिका पळवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. 

नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वाराने पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

राजस्थानमधील बाडमेर येथे मंगळवारी सायंकाळी तिघांनी मास्कसाठी रुग्णवाहिका पळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून दोघे फरार आहेत.

एका गर्भवती महिलेला बलोतरा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णवाहिका पारु या गावी जात होती. बलोतरा शहरात ही रुग्णवाहिका अडवण्यात आली. याठिकाणी तिघांनी चालकाकडे मास्कची मागणी केली. चालकाने मास्क नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी चालकाला मारले. एवढेच नाही तर रुग्णवाहिकेसह तेथून पळ काढला. 

लॉकडाऊन: १४ एप्रिलपर्यंत सर्व गाड्या रद्द, रेल्वेचा मोठा निर्णय

रुग्णवाहिकेचा चालकाने दुसऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला फोनकरुन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याने तात्काळ पोलसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी  जीपीएस सिस्टमच्या माध्यमातून रुग्णवाहिकेचा पाठलाग केला. पोलिस पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी रुग्णवाहिका सोडून पळ काढला. तिघांपैकी एकाला पोलिसांनी अटक केले असून दोघांचा शोध पोलिस घेत आहेत.