पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केरळः आरटीआयअंतर्गत पंतप्रधान मोदींच्या नागरिकत्वाचे पुरावे मागितले

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) सुरु असलेल्या विरोधादरम्यान केरळमध्ये एका व्यक्तीने माहिती अधिकारा अंतर्गत (आरटीआय) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागरिकत्वाचे पुरावे मागितले आहेत. राज्याच्या माहिती विभागात अर्जाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे भारतीय नागरिक आहेत का, असा सवाल विचारण्यात आला आहे. 

न्याय मिळण्यास उशिर होतोय याला 'आप' जबाबदार; निर्भयाच्या वडिलांचा आरोप

त्रिशूर जिल्ह्यात राहणाऱ्या जोश कलूवेत्तीने १३ जानेवारीला केरळच्या माहिती विभागाला माहिती मागितली होती. पंतप्रधान मोदी हे भारताचे नागरिक आहेत, हे सिद्ध करणारे कोणते दस्तावेज आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. 

भारतरत्न पुरस्कारापेक्षा महात्मा गांधी मोठे, सुप्रीम कोर्टाने जनहित याचिका फेटाळली

उल्लेखनीय म्हणजे, राज्यात सत्ताधारी आघाडी एलडीएफ आणि विरोधी आघाडी यूडीएफ दोघांचाही सीएएला विरोध आहे. नुकताच केरळच्या विधानसभेत सीएएविरोधात प्रस्ताव संमत करण्यात आला. तसेच या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धावही घेण्यात आली आहे.

निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली