पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी मोदी म्हणाले, भारताला मिळतील मोठ्या संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्याभराच्या दौऱ्यासाठी आज रात्री उशिरा अमेरिकाला रवाना होतील. पंतप्रधान मोदी हे २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेला संबोधित करतील आणि त्याच दिवशी ते भारतात परततील. ते आपल्या ८ दिवसीय दौऱ्यात 'हाऊडी मोदी' समवेत अनेक कार्यक्रमात सहभागी होतील. आज रवाना होण्यापूर्वी मोदी यांनी टि्वट करत या कार्यक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, अमेरिका दौऱ्यावर अनेक उच्चस्तरीय कार्यक्रमांमुळे भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध आणखी दृढ होतील. मोदींनी यावेळी भारताला मिळणाऱ्या महत्वाच्या संधींचा उल्लेख केला. 

ह्यूस्टनमध्ये कार्यक्रम

पंतप्रधान म्हणाले की, मी तिथे अनेक महत्वाच्या बहुपक्षीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. तिथे स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाबरोबरच उद्योजकांशी भेट होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ह्यूस्टनमध्ये विविध कार्यक्रमांनी होईल. तिथे ऊर्जा क्षेत्रातील सीईओज, तिथे स्थायिक झालेले भारतीयांचे विविध समूह आणि आघाडीच्या अमेरिकन नेत्यांबरोबर चर्चा होईल. त्याचबरोबर ऊर्जावान शहर ह्यूस्टनमध्ये कार्यक्रमांमुळे आपल्या संबंधांना आणखी जास्त ऊर्जा मिळेल. 

प्रतीक्षा संपुष्टात; हवाईदलाच्या ताफ्यात पहिलं 'राफेल' दाखल

ह्यूस्टनमध्ये २२ सप्टेंबरला स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.१५ वाजता एक मोठा सार्वजनिक कार्यक्रम होईल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शान वाढवतील. त्यांनी #HowdyModi सह लिहिले की, हा कार्यक्रम भारत-अमेरिकेच्या संबंदातील मैलाचा नवा दगड सिद्ध होईल.