पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत कोरोनामुळे ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेत कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. या विषाणूमुळे जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४० हजार पार झाला आहे. तर आतापर्यंत साडे सात लाख नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जॉन हॉपकिंस विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत ४० हजार ५८५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे सर्वात जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

पालघरमधील घटना गैरसमजुतीतून, धार्मिक रंग देऊ नकाः ठाकरे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, भारतासह १० अन्य देशांनी कोविड - १९ संदर्भात जेवढा तपासणी केली नाही त्यापेक्षा जास्त तपासणी अमेरिकेने केली आहे. अमेरिका कोरोनाविरोधातील लढाईमध्ये प्रगती करत आहे. देशामध्ये आतापर्यंत ४१ लाख ८ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत हा विक्रम आहे. 

फरार उद्योगपती विजय मल्ल्याला इंग्लंडमध्ये झटका

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आम्ही फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, भारत, ऑस्ट्रेलिया, स्वीडन आणि कॅनडा या देशांपेक्षा अधिक तपासणी केली आहे.' न्यूयॉर्कमध्ये २ लाख ४२ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत १७ हजार ६०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना: नो मास्क, नो पेट्रोल-डिझेल, देशभरात लागू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:america coronavirus death toll reached 40000 more than 750000 positive cases in the country