पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड आणि कोरोना, दाम्पत्यांनी केलं जुळ्यांचं नामकरण

जुळी बालके (संग्रहित छायाचित्र)

जगात सध्या कोरोना आणि कोविड-१९ या नावाची दहशत आहे. परंतु, छत्तीसगडमध्ये एका जुळ्या भाऊ-बहिणीचं नामकरणच चक्क कोरोना आणि कोविड असे करण्यात आले आहे. रायपूरच्या जुन्या वस्तीतील रहिवासी विनय वर्मा आणि प्रीति वर्मा यांनी आपल्या जुळ्यांपैकी मुलाचे नाव कोविड तर मुलीचे नाव कोरोना ठेवले आहे. 

प्रीति वर्मा यांना रायपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. भीमराव आंबेडकर रुग्णालयात एक आठवड्यापूर्वी जुळे झाले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या मुलांचे नामकरण केले. 

राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा विचार करा, शहांचा काँग्रेसवर पलटवार

याबाबत प्रीति शर्मा म्हणाल्या की, सर्वांच्या डोक्यात सध्या कोरोनाचाच विचार सुरु आहे. अशावेळी लोकांच्या मनातील भय दूर करण्यासाठी मुलाचे नाव कोविड तर मुलीचे नाव कोरोना ठेवण्याचा निर्णय घेतला. 

या निर्णयाचे सोशल मीडियावर अनेकांना स्वागत केले आहे तर काहींनी यावर टीका देखील केली आहे. 

राज्यातील ३० शासकीय रुग्णालये 'कोविड-१९ रुग्णालय' म्हणून घोषीत

मुले आणि त्यांची आई तिघेही सुदृढ आहेत. एका मुलाचे वजन २.९ किलोग्रॅम तर दुसऱ्याचे वजन २.७ किलोग्रॅम आहे. इंडियन एक्स्प्रेसनुसार, डॉ. भीमराव आंबेडकर मेमोरियल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही प्रसुती केली. 

प्रीति वर्मा पुढे म्हणाल्या की, मध्यरात्री जेव्हा मला पोटात वेदना होत होत्या. त्यावेळी रुग्णालयात येण्यासाठी आम्हाला कोणतेही वाहन मिळाले नव्हते. त्यावेळी माझ्या पतींनी दुचाकीवर मला रुग्णालयात आणले. रस्त्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी आमची चौकशी केली होती.

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागांत एँटिबॉडी टेस्ट घ्या, ICMR चे निर्देश