पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जय श्रीराम' बंगाली संस्कृतीचा हिस्सा नाहीः अमर्त्य सेन

अमर्त्य सेन (Samir Jana/HT File Photo)

जय श्रीरामची घोषणा बंगाली संस्कृतीशी संबंधित नाही. त्याचा वापर लोकांना मारण्यासाठी केला जात आहे, असे वक्तव्य नोबेल पुरस्काराने सन्मानित अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केले आहे. जादवपूर विद्यापीठात ते बोलत होते. 'माँ दुर्गा' बंगालींच्या जीवनात सर्वव्याप्त असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. 

भाजपने अमर्त्य सेन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, अमर्त्य सेन यांना कदाचित बंगालबाबत माहिती नाही. त्यांना बंगाली आणि भारतीय संस्कृतीबाबत काही माहिती आहे का ?, असा सवाल करत जय श्रीरामची घोषणा प्रत्येक गावात दिली जाते. आता संपूर्ण बंगालमध्ये ती घोषणा दिली जाते, असे म्हटले. 

सेन यांनी, जय श्रीरामची घोषणा बंगाली संस्कृतीचा हिस्सा नसल्याचे म्हटले होते. आज-काल लोकप्रियतेसाठी रामनवमी साजरा केली जाते. काही वर्षांपूर्वी याबाबत अधिक ऐकायलाही मिळत नसत, असे त्यांनी म्हटले.

ते म्हणाले, मी एकदा माझ्या चार वर्षांच्या नातीला तिचा आवडता देव कोणता, असा प्रश्न विचारला. त्यावेळी तिने माँ दुर्गा असे उत्तर दिले. माँ दुर्गा आमच्या आयुष्यात आहे. मला वाटते की, जय श्रीराम सारख्या घोषणा या लोकांना मारण्यासाठी केल्या जातात.