पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला हटवून सिद्धूंना मुख्यमंत्री व्हायचं आहे- अमरिंदर सिंग

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (ANI)

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात सध्या सारे काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याविरोधात नाराजी दर्शवली होती. त्याचे सिद्धू यांनीही समर्थन केले होते. याचदरम्यान अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांची महत्वकांक्षा बोलून दाखवली आहे. सिद्धू यांना कदाचित मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे असे त्यांनी म्हटले आहे. 

'पंजाबमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यास राजीनामा देईन'

पंजाबमध्ये १३ जागांसाठी रविवारी सातव्या टप्प्यात मतदान होत आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पटियाला येथे मतदान केले. मतदानानंतर त्यांनी सिद्धू यांचा उल्लेख करत म्हटले की, नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबरोबर माझे काही शाब्दिक युद्ध सुरु नाही. जर ते महत्वकांक्षी असतील तर यात चुकीचे काय आहे. लोकांना महत्वकांक्षा असते. मी त्यांना लहानपणापासून ओळखतो. माझ्यात आणि त्यांच्यात कोणतेही वैचारिक मतभेद नाहीत. कदाचित त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल आणि त्यांना मला हटवायची इच्छा असेल. त्यांची हीच अडचण आहे. 

राहुल गांधी तोफ तर मी AK-47: नवज्योतसिंग सिद्धू

यावेळी अमरिंदर यांनी पंजाबमध्ये काँग्रेसच्या विजयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. नवज्योत कौर यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अमरिंदर सिंग आणि पक्षाच्या सरचिटणीस आशा सिंह यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Amarinder Singh says Navjot Singh Sidhu wants to become CM and replace me loksabha election 2019