पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजस्थान: सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची कॉन्स्टेबल पदी नियुक्ती

पतीच्या समोरच या नराधमांनी पीडितेवर सामुहिक बलात्कार

राजस्थानमधील अलवर जिल्हातील थानागाझी-अलवर महामार्गावर सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या पीडितेला राजस्थान सरकारने कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त केले आहे. राजस्थानच्या कॅबिनेटने मंगळवारी पीडितेच्या नियुक्तीला मंजूरी दिली. लवकरच पीडितेला नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. 

जातीवाचक टीकेमुळे मुंबईत वैद्यकीयच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

२६ एप्रिल २०१९ रोजी थानागाझी-अलवर बायपासवर ६ अज्ञातांनी पीडित महिला आणि तिच्या पतीला अडवले आणि निर्मनुष्य जागेत घेऊन गेले. त्या ठिकाणी या नराधमांनी संबंधीत महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला. या धक्कादायक घटनेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी संबंधित पीडित महिलेची भेट घेतली होती. त्यांनी पीडितेला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते.  

 

बालेवाडी क्रीडा संकुलात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, व्यवस्थापकाला अटक

अलवर ग्रामीण पोलीस उपाधीक्षक जगमोहन शर्मांनी दिलेल्या माहितीनुसार, सामुहिक अत्याराची शिकार झालेल्या महिलेने  सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत न्यायालयाच्या समोर तक्रार दाखल केली होती. याप्रकरणातील सहा आरोपींविरोधात पोलिसांनी अलवर एससी-एसटी कोर्टाच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यातील पाच जणांवर बलात्काराचा तर एक जणावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.