निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबातील सदस्यांनी राष्ट्रपतींकडे दयामरणाची मागणी करणारं पत्र लिहिले आहे. यात आरोपींचे वृद्ध पालक, भावंड आणि मुलांचा समावेश आहे.
आम्हाला दयामरणाची परवानगी द्या, जेणेकरून भविष्यात निर्भयासारख्या घटना घडणार नाही आणि न्यायालयावर एकाच वेळी पाच जणांना फाशीची शिक्षा देण्याची वेळ येणार नाही, असं या पत्रात म्हटलं आहे. आपल्या देशात महापापींना देखील माफ केलं जातं. ताकद किंवा शक्तीचा अर्थ सूड उगवणे असा होत नाही, माफ करण्यात खरी ताकद आहे असंदेखील या पत्रात लिहिलं आहे. निर्भया प्रकरणातील दोषी विनय शर्मा, अक्षय सिंग ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश सिंग यांना २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे.
COVID-19: जगभरात ६ हजारांहून अधिक लोकांनी गमावला जीव
तर यातील दोषी मुकेश सिंग याच्या भावाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. चारही दोषींसमोरील कायदेशीर मार्ग बंद झाल्यानंतर दिल्लीतील पटियाला न्यायालयाने चारही दोषींना २० मार्च रोजी साडेपाच वाजता फासावर लटकवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या या निकालानंतर दोषी मुकेशचा भाऊ सुरेश याच्यावतीने वकील एम एल शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे.
क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असताना मुकेशवर यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मुकेशला नव्याने क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका दाखल करण्याची संधी देण्यात यावी, असे या याचिकेत म्हटले आहे.
सोलापूर : ZP शाळेत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन संवादाचा भन्नाट उपक्रम