पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बलात्काराच्या प्रकरणात स्वामी चिन्मयानंद यांना हायकोर्टाकडून जामीन

स्वामी चिन्मयानंद यांना जामीन मंजूर

एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी भाजपतून हकालपट्टी करण्यात आलेले स्वामी चिन्मयानंद यांना जामीन मंजूर केला. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये स्वामी चिन्मयानंद यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप संबंधित विद्यार्थिनीने केला होता.

फोन टॅपिंगच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती, ६ आठवड्यांची मुदत

पीडित विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरमधील चिन्मयानंद यांच्याच एका विधी महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत आहे. या प्रकरणात चिन्मयानंद यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७५ सी (पदाचा गैरवापर करून लैंगिक शोषण) ३५४ डी (मारहाण), ३४२ आणि ५०६ (गुन्हेगारी कृत्य) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले आहे. याच पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जातो आहे. 

हेगडेंच्या त्या विधानावरून पक्षश्रेष्ठी नाराज, माफी मागण्याची सूचना

२३ ऑगस्ट २०१९ रोजी एका महिलेने या प्रकरणी व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये एका पक्षाचा नेता तिला त्रास देत असून, मारण्याची धमकी देत असल्याचे तिने म्हटले होते.