पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांद्रयान २ : विक्रम लँडरसंदर्भात इस्रोने जारी केली नवी माहिती

चांद्रयान २

चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) मंगळवारी देण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर झुकलेल्या अवस्थेत आहे. 

सरकार आपले डोळे कधी उघडणार?, प्रियांका गांधींचा मार्मिक प्रश्न

इस्रोच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, विक्रम लँडरचा शोध ऑर्बिटरने घेतला आहे. पण त्याच्याशी अद्याप संपर्क प्रस्थापित झालेला नाही. विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. 

लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी इस्रोकडे आणखी ११ दिवसांचा अवधी आहे. चंद्रावतरणानंतर १४ दिवसांच्या आत लँडरशी संपर्क प्रस्थापित होणे आवश्यक आहे. 

एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा स्वीकारला

गेल्या शनिवारी पहाटे अपेक्षित कार्यक्रमानुसार विक्रम लँडर चद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होता. पण चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरवर असताना विक्रम लँडरशी इस्रोच्या मुख्यालयाचा असलेला संपर्क तुटला होता. तेव्हापासून संपर्क प्रस्थापित करण्याचे काम सुरू आहे. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग केले असून, तो झुकलेल्या अवस्थेत आहे, अशी माहिती सोमवारी समोर आली होती.