पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट

वायू दल

जम्मू-काश्मीरमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, वायूदल आणि सुरक्षा दलाला हाय अलर्ट देण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अस्थिर करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारी आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून ही माहिती मिळाली आहे. त्यामुळेच या सर्व सुरक्षा दलांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्रींची निवड

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बी. एस सुब्रमण्यम यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हळू-हळू पूर्वपदावर येत आहे. पुढच्या काही दिवसात इंटरनेट आणि टेलिफोन सेवा देखील सुरु करण्यात येईल. तसंच सोमवारी जम्मू-काश्मीरमधील शाळा सुरु होतील. जम्मू-काश्मीरमध्ये लागोपाठ १२ व्या दिवशी बंद कायम आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू

प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काश्मीर खोऱ्यामध्ये आता शांतता आहे. मात्र या भागामध्ये लष्कराचा बंदोबस्त कायम आहे. गेल्या आठवड्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये शाळा बंद आहेत. दुकान आणि बाजारपेठा देखील ५ ऑगस्टपासून बंद आहेत. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवर नजर ठेवली जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

बलुचिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले; ४ जणांचा मृत्यू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:all indian army air force and security forces bases in jammu kashmir asked to be on high alert