पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ईएमआय ३ महिन्यांसाठी स्थगित, RBI चा मोठा दिलासा

आरबीआय

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपादरम्यान आज आरबीआयने रेपो रेट ५.१५ टक्क्यांवरुन ४.४ टक्क्यांवर आणला आहे. रेपो रेटमध्ये ७५ बेसिस पाँईट्सची कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेटमध्येही ९० बेसिस पाँईट्सची कपात केली आहे. चलनविषयक धोरण समितीच्या चार सदस्यांनी रेपो दर कपातीच्या बाजूने तर दोघांनी विरोधात मतदान केले. सध्याच्या स्थितीवर आरबीआयची कडक नजर असून देशात रोकड वाढवण्यासाठी हरतऱ्हेचे पाऊल उचलले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कर्जावरील व्याजदरात कपात, आरबीआयचे गव्हर्नर दास यांची घोषणा

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. आरबीआयच्या या पावलांमुळे गृह, वाहन किंवा इतर कर्जांचे ईएमआय भरणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळू शकतो. सर्वसामान्य लोकांबरोबर व्यवसायावर होत असलेला कोरोनाचा परिणाम पाहता सरकारने कर्जाच्या हप्त्यावर दिलासा देण्याची तयारी सुरु केली आहे. 

कोरोना तपासणी करायची आहे?, मग या लॅब्जमध्ये जा...

रिझर्व्ह बँकेने आधीच चालू असलेल्या कर्जाची ईएमआय देयके तीन महिन्यांकरिता पुढे ढकलली आहेत. हा निर्णय सर्व व्यावसायिक बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका तसेच बिगर वित्तीय व्यावसायिक बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जावर लागू होईल. याचाच अर्थ हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून घेण्यात आलेल्या गृह कर्जावरही ईएमआयलाही तीन महिन्यांची स्थगिती मिळेल. 

खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

याचाच अर्थ तीन महिन्यांपर्यंत कोणाच्याही खात्यातून ईएमआय कापला जाणार नाही. तीन महिन्यानंतर पुन्हा ईएमआय घेतले जातील. आरबीआयने १ मार्चपासून हे लागू केले आहे. याचाच अर्थ आता जून महिन्यापासून ईएमआय द्यावे लागतील.

ईएमआय माफ केले नसून केवळ तीन महिन्यांसाठी स्थगित केले आहेत. जर तुमचे कर्ज २०२१ मधील जानेवारीमध्ये संपणार असेल तर तेच कर्ज आता एप्रिल २०२१ मध्ये संपेल. याचा कर्जदाराच्या क्रेडिट हिस्ट्रीवर परिणाम होणार नाही. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:all banks including NBFCs being permitted to allow a moratorium of 3 months on payment of installments says RBI governor due to coronavirus outbreak