पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेच्या हल्ल्यात अल कायदाचा नेता कासिम अल-रेमी ठार

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेने यमनमध्ये केलेल्या दहशतवादीविरोधी कारवाईमध्ये अल-कायदाच्या दोन नेत्यांना ठार करण्यात आले आहे. अल-कायदा इन अरब पेनिसुलाचा संस्थापक आणि अल-कायदाचा नेता कासिम अल-रेमी याला अमेरिकेने ठार केले. अमेरिकेच्या या कारवाईमध्ये अल-कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी हा देखील मारला गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार्गदर्शनाखाली यमनमध्ये ही दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली आहे.

चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरुच; मृतांचा आकडा ६३६ वर

कासिम अल-रेमीबाबत माहिती देणाऱ्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी १० मिलियन डॉलर म्हणजेच ७१ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. कासिम अल-रेमी २०१५ पासून अल-कायदा इन अरब पेनिसुला या संघटनेचे नेतृत्व करत होता. याआधी अमेरिकेने इराकची राजधानी बगदाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एअर स्ट्राइक करत इराणचा टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी याला ठार केले होते. जनरल सुलेमानी इराणच्या अल-कुद्स फोर्सचा प्रमुख होता. 

'कोरोना'च्या विळख्यातील पाक विद्यार्थ्यांची मदत करु,