पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अल कायदाचा म्होरक्या आसिम उमर ठार; मोदींना दिली होती धमकी

अल कायदाचा म्होरक्या असीम उमर

अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटचा (एक्यूआयएस) म्होरक्या आसिम उमर ठार झाला आहे. अफगानिस्तान आणि अमेरिकेच्या सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये उमसह ६ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये बहुतेक पाकिस्तानचे नागरिक आहेत.

अपाचे आणि राफेलमुळे पाकिस्तान घाबरला; चीनकडे मागितली मदत

अफगाणिस्तानच्या नॅशनल डायरेक्टर सिक्युरिटीने ट्विट करत सांगितले की, 'दक्षिण हेलमंद प्रांतात २२ आणि २३ सप्टेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये दहशतवादी ठार झाले होते. याचा खुलासा ८ ऑक्टोबर रोजी झाला आहे. ठार करण्यात आलेले सर्व दहशतवादी अफगाणिस्तानच्या मूसा काला भागामध्ये लपले होते. मागच्या महिन्यात झालेल्या एका कारवाईत अमेरिकी सैन्यांनी त्याला मारले होते.

पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढू, उद्धव ठाकरेंचा सूचक इशारा

आसिम उमर हा अल कायद्याचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीच्या जवळचा होता. त्याने २०१५ साली एक व्हिडीओ जारी करत अमेरिका, संयुक्त राष्ट्र संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्लामचा शत्रू असल्याचे सांगत हल्ला करण्याची धमकी दिली होती. आसिम उमह हा उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील निवासी होता. त्याचे नाव सनाउल हक होते. आसिमला २०१४ साली अल कायदा म्होरक्या अयमानने एक व्हिडीओ जारी करत दक्षिण आशियाचा म्होरक्या म्हणून घोषीत केले होते. 

...तर पवाराची औलाद सांगणार नाही: अजित पवार