पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मायावतींनी HM अमित शहांचे चॅलेंज स्वीकारलं

मायावती

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यानंतर आता बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या मुद्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे. पक्ष सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावर कोणत्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 

..तर ओवेसी सूर्य पश्चिमेला उगवतो असे म्हणतील: अमित शहा

यापूर्वी एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्यावर चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. लखनऊ येथील कार्यक्रमात अमित शहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,मायावती यांना सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व मुद्यावर चर्चेसाठी पुढे येण्याचे आव्हान दिले होते. यावर ओवेसींनी माझ्याशी चर्चा करा, अशी भूमिका मांडली होती.  

विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठीच हल्ला, ओवेसींची टीका

मायावती यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. सीएए-एनआरसी, एनपीआरच्या विरोधात देशातील युवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपली बाजूही मांडली आहे. आमचा पक्षा कोणत्याही व्यासपीठावर या विषयावर चर्चा करण्यास तयार आहे, असे ट्विट मायावती यांनी केले आहे.  

 

BJP सरकारवर पलटवार करत सिब्बल यांनी दिले शहांना चॅलेंज

तत्पूर्वी अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आम्ही विकासावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. देशात बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यानंतर आता युवकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अर्थव्यवस्था, बेरोजगार यावर मौन बाळगणाऱ्यां सरकारने किमान  विकासावर चर्चा करावी, यासाठी आम्ही तयार आहोत, असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते.