पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्रात मोठे प्रशासकीय फेरबदल, भल्ला गृह विभागात ओएसडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह

केंद्र सरकारमध्ये प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सरकारने बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) या पदावर ऊर्जा सचिव अजयकुमार भल्ला यांची नियुक्ती केली. मिळालेल्या माहितीनुसार अजयकुमार भल्ला हेच पुढील गृह सचिव होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. अजयकुमार भल्ला हे आसाम-मेघालय केडरचे १९८४ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. येत्या ३१ ऑगस्टला केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांची जागा अजयकुमार भल्ला घेऊ शकतात.

CSMT ते ठाणे मार्गावर लवकरच भूमिगत लोकलची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळ नियुक्तीविषयक समितीने तात्काळ प्रभावाने अजयकुमार भल्ला यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून गृह मंत्रालयात नियुक्ती करण्याला मंजुरी दिली आहे. या आदेशात अजयकुमार भल्ला हे पुढील गृह सचिव असतील, असा कोणताही उल्लेख नाही. पण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेच पुढील गृह सचिव असतील.

अजयकुमार भल्ला हे २०२१ पर्यंत या पदावर कार्यरत असतील. दुसऱ्या मोठ्या बदलामध्ये गुजरात केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अतनू चक्रवर्ती यांची सरकारने अर्थ मंत्रालयातील आर्थिक प्रकरणाच्या विभागात सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. ते १९८३ च्या बॅचचे राजस्थान केडरचे अधिकारी एस सी गर्ग यांची जागा घेतील. गर्ग यांना सरकारने ऊर्जा सचिव म्हणून नियुक्त केले आहे. 

डहाणू, तलासरीमध्ये भूकंपाचे धक्के; स्थानिक भयभीत

सरकारने अनुराधा मित्रा यांना अधिकृत भाषा विभागाच्या सचिव म्हणून नियुक्त केले आहे. या सर्व अधिकाऱ्यांव्यतिरिक्त भारतीय प्रशासकीय सेवेतील १९८६ च्या बॅचच्या एकूण आठ अधिकाऱ्यांची विविध विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.