पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमधील आमदाराच्या घरातून एके-४७ आणि ग्रेनेड जप्त

आमदार अनंत सिंह

बिहारच्या मोकामा मतदार संघाचे आमदार अनंत सिंह यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. त्यांच्या घरातून एके-४७, ग्रेनेड आणि जीवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत. एटीएसच्या टीमने अनंत सिंह यांच्या घरावर पोलिस बंदोबस्तासह आज छापा टाकला. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएची टीम देखील रवाना झाली आहे. या व्यतिरिक्त बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलवण्यात आले आहे.

 

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनंत सिंह यांच्या घरामध्ये एका पिवळ्या रंगाच्या कागदामध्ये अत्याधुनिक शस्त्र लपवण्यात आली होती. एके-४७, ग्रेनेड आणि जीवंत काडतुस त्यांच्या घरातून जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या शस्त्राबाबत एटीएसची टीम संभ्रमात आहे. जप्त केलेले हत्यार एके- ४७ की एके - ५८ आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ग्रेनेड स्फोट होण्याची शक्यता पाहता बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलविण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू

शुक्रवार सकाळी ११ वाजल्यापासून छापा सुरु आहे. पोलिसांकडून त्यांच्या संपूर्ण घराची तपासणी सुरु आहे. या घरामध्ये एक वयोवृध्द व्यक्ती उपस्थित आहे. हीच व्यक्ती या घराचा सांभाळ करते. पोलिसांची टीम दाखल झाली असता या व्यक्तीनेच घराचा दरवाजा उघडला होता. दरम्यान, पोलिसांनी अद्याप त्याला अटक केली नाही. 

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्रींची निवड