पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐश्वर्या रायपासून जीवाला धोका, लालूंच्या पत्नीची तक्रार

लालूंच्या पत्नीची तक्रार

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी सून ऐश्वर्या रायविरोधात उलट तक्रार दाखल केली आहे. ऐश्वर्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, तसेच १५ डिसेंबरला ऐश्वर्यानं जीवघेणा  हल्ला  केला असं राबडीदेवींनी म्हटलं आहे. यामुळे पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या घरातील गृहकलह चव्हाट्यावर आले आहेत. 

सोशल मीडियांवरील अफवा, फेक न्यूज रोखा, केंद्राची राज्यांना सूचना

रविवारी सून ऐश्वर्या रायनं सासू राबडी देवी तसेच अन्य कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप केले होते. राबडी देवी यांनी माझे केस ओढले आणि मला मारहाण केली. त्यानंतर निवासस्थानी नियुक्तीला असलेल्या सुरक्षारक्षकांनी मला बळजबरीने घराच्या बाहेर काढले. तसेच हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचा आरोप ऐश्वर्याचा होता. 

बहिणीनं विरोधात केलं लग्न, भावाची कांदिवलीत गोळी झाडून आत्महत्या

त्यानंतर लगेच राबडीदेवींनीही  ऐर्श्वयाविरोधात तक्रार नोंदवली आहे. माझ्या जीवाला ऐश्वर्यापासून धोका आहे. तिनं रविवारी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. मी त्यातून कशीबशी बाहेर पडले. ऐर्श्वर्यानं मला शिवीगाळही केली तसेच खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकीही दिली असं राबडीदेवींनी म्हटलं आहे.