पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमधून बाहेर जाणाऱ्यांना एअर इंडियाचा दिलासा, तिकीटदरात कपात

एअर इंडिया

एअर इंडियाने श्रीनगरवरुन येण्यासाठी आणि जाण्यासाठीच्या विमान तिकीटांच्या दरात कपात केली आहे. जम्मू-काश्मीरमधील सध्याची स्थिती पाहता एअर इंडियाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. अनेक खासगी कंपन्यांनी तिकीटाचे दर मोठ्याप्रमाणात वाढवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा निर्णय प्रवाशांसाठी महत्वाचा आहे. श्रीनगरहून देशातील कोणत्याही भागातून येणारी आणि तिथे जाणाऱ्या विमानांचे कमाल तिकीट दर हे ९५०० रुपये निश्चित केले आहे. तर श्रीनगर ते दिल्लीला जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर ६७१५ आणि दिल्ली ते श्रीनगरसाठी ६८९९ रुपये कमाल भाडे निश्चित करण्यात आले आहे. 

एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी सांगितले की, श्रीनगरमधून देशातील कोणत्याही भागात जाण्यासाठी ९५०० भाडे असेल. तर राजधानी दिल्लीसाठी ६७१५ रुपये असेल. ही सुविधा १५ ऑगस्टपर्यंत देण्यात येईल.

भारतीय सैन्याने पाकला म्हटले, पांढरे निशाण घेऊन या, मृतदेह घेऊन जा

उल्लेखनीय म्हणजे, एअर लाईन्सने १५ ऑगस्टपर्यंत श्रीनगरला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या उड्डाणांचे तिकीट रद्द करणे किंवा त्याची तारीख बदलण्यावरील शूल्क यापूर्वीच माफ केले आहे. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे राज्य प्रशासनाने सर्व पर्यटक तसेच भाविकांना त्वरीत काश्मीर खोरे सोडण्याची सूचना केली आहे. त्यामुळे विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी तिकीटाचे दर वाढवले आहेत.

काश्मीरमध्ये सरकार भीतीचे वातावरण निर्माण करत आहेः काँग्रेस

शनिवारी ६२१६ प्रवाशांना श्रीनगर विमानतळावरुन नेण्यात आले होते. त्यामध्ये ३८७ प्रवाशांना हवाई दलाच्या चार विमानांच्या मदतीने जम्मू, पठाणकोट आणि हिंडन येथे पाठवण्यात आले होते. तर इतर प्रवाशांना नियमित विमान सेवा देणाऱ्या विमान कंपन्यानी नेले.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:airindia reduces fare at Rs 6715 srinagar to delhi and at Rs 6899 Delhi to srinagar till 15th august