एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांचा अटकपूर्व जामीन ३० मेपर्यंत वाढविला आहे. दिल्लीतील न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी सोमवारी हा निर्णय दिला.
पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांचा अटकपूर्व जामीन वाढविण्यात यावा, अशी मागणी त्यांचे वकील ए.एम. सिंघवी यांनी केली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) तपास सुरू आहे. तपास पूर्ण व्हायला अजून वेळ लागेल, असे सरकारी वकील तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले.
एअरसेल-मॅक्सिस यांच्यातील व्यवहाराला परकीय गुंतवणूक प्रवर्तन मंडळाने मंजुरी देताना त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांनंतर या प्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Aircel Maxis case: Delhi's Rouse Avenue Court extended the interim protection of P Chidambaram and Karti Chidambaram till 30th May as prosecution agencies sought more time to complete the investigation.
— ANI (@ANI) May 6, 2019