पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रदूषणापासून ताज महालाला वाचविण्यासाठी आता हा उपाय

ताज महाल

उत्तर भारतातील हवा प्रदूषणाच्या विळख्यापासून ताज महालाला वाचविण्यासाठी आता या ठिकाणी हवा शुद्धीकरणाचे (एअर प्युरिफायर) यंत्र बसविण्यात आले आहे. एअर प्युरिफायर व्हॅन ताज महालाच्या परिसरात तैनात करण्यात आली असून, या माध्यमातून या ठिकाणची हवा शुद्ध करण्याचे काम करण्यात येत आहे.

मॅकडोनाल्डच्या CEO ची हकालपट्टी, कर्मचाऱ्याशी संबंध भोवले

उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकारातून ही व्हॅन या परिसरात तैनात करण्यात आली आहे. ३०० मीटर परिसरातील १५ लाख क्युबिक मीटर हवेचे आठ तासांत शुद्धीकरण करण्याची या व्हॅनची क्षमता आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी भुवन यादव म्हणाले, सध्या हवा अत्यंत खराब असल्यामुळे आणि प्रदूषण आणखी वाढल्यामुळे एअर प्युरिफायर व्हॅन ताज महालाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारापाशी तैनात करण्यात आली आहे.

हवेतील वाढत्या प्रदूषणाचा फटका ताज महाल या ऐतिहासिक वास्तूला बसण्याची शक्यता खूप आधीपासून वर्तविण्यात आली आहे. ताज महाल ही वास्तू जगातील सात आश्यर्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्याचे वैभव जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दिल्लीत आजपासून 'सम-विषम' लागू, उल्लंघन केल्यास ४ हजारांचा दंड

२४ ऑक्टोबर रोजी ही व्हॅन आग्रामध्ये आणण्यात आली. त्यानंतर दिवसेंदिवस हवेतील प्रदूषण वाढतच चालल्यामुळे ही व्हॅन ताज महालाच्या पश्चिम प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आली आहे.