पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जिलबीवरून दिल्लीत राजकीय वातावरण 'गंभीर'

गौतम गंभीर सोशल मीडियावर ट्रोल

राजधानी दिल्लीतील प्रदूषणावर  उपाय शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला खासदार गौतम गंभीरनं  दांडी मारली. बैठकीला उपस्थित राहण्याऐवजी इंदूरमध्ये जिलबीवर ताव मारणाऱ्या गौतम विरोधात दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच 'गंभीर' झाले आहे.
दिल्लीमधील प्रदूषणाची चिंता अत्यंत गंभीर आहे. इथे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य आणिबाणी जाहीर करण्यात आली होती.

... अशा शेजाऱ्याशी कोण चर्चा करेल, जयशंकर यांनी पाकला फटकारले

प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठक आयोजित केली होती. मात्र याला अनुपस्थित राहिल्यानं दिल्लीकरांनी भाजप खासदार गौतम गंभीरवर सडकून टीका केली आहे. 

त्यानंतर गौतम गंभीरनं आपल्या ट्विटरवर पोस्ट लिहिली आहे. मी माझ्या मतदार संघात लोककल्याणासाठी अनेक कामं केली आहेत. यात गाझीपूरचा प्रश्न, पालिकेच्या शाळेतील मुलांना डिजीटल क्सासेस, महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड मशिन्स, गरीबांना मोफत जेवण अशी अनेक कामे मी केली आहे. मला ज्या लोकांनी निवडून दिले. त्यांच्या कल्याणासाठी मी गेले ६ महिने दिवस रात्र काम करत आहेत. सकाळी १ वाजल्यापासून मी माझ्या मतदारसंघातील कार्यालयात असतो. त्या दिवशी सर्वांच्या समस्या ऐकून झाल्यानंतरच मी घरी जातो. मी लोकांसाठी काम करतोय. माझ्या मतदारांना माझे काम ठावूक आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कितीही चुकीची माहिती दिली तरी माझा मतदारसंघ माझ्या कामाविषयी जाणून आहे' असं ट्विट गंभीर यानं केलं आहे. 

दिशाभूल करण्याचा हेतू नाही, सई, सिद्धार्थचं स्पष्टीकरण